TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 12 जुलै 2021 – मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यं करत महाविकास आघाडीत वाद निर्माण करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी एक गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर पाळत ठेवत आहेत. असा गंभीर आरोप करत नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधलाय.

नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास लावला आहे, असं म्हटलं आहे. माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर होते, असं सांगत नाना पटोले यांनी वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आहे.

पाळत ठेवण्याबाबत माझा सरकारवर कोणताही आरोप आंही. मुंबईत आल्यावर यावर सविस्तर प्रतिक्रिया देईन, असे नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी आहे, असं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलोय, असं नाना पटोले यावेळी म्हणाले होते. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केलाय. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं आहे.

मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल :
महाराष्ट्रात काँग्रेस उभी होत आहे, हे त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट दररोज मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो.

कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे? याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल.

रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली, हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं आहे.

त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलीय :
स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागलीय. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार, असाही आरोप यावेळी त्यांनी केलाय.

सोबत राहून पाठीत सुरा खुपसला जातोय :
लोणावळा इथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

यावेळी नाना पटोले म्हणाले, मी जे बोललो त्यात माघार घेणार नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आपण कामाला लागावे. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलंय.

मग, मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही, असा चिमटा पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना काढला आहे.

यावेळी नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग, आपण संपर्क मंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो. पण, संपर्क मंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते.

संपर्क मंत्र्यांची सही लागत नाही. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे, असे नाना पटोले म्हणाले होते.

‘या’ लहान माणसाबाबत मी काय बोलू – शरद पवार
नाना पटोले यांच्या वक्तव्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, या गोष्टीत मी पडत नाही.

ती लहान माणसं आहेत. त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज