TOD Marathi

28 तासांमध्ये शेर बहादूर देऊबा यांना PM करा, Nepal SC चे आदेश ; K. P. Sharma Oli यांना धक्का

टिओडी मराठी, दि. 12 जुलै 2021 – नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की, पुढील २८ तासांमध्ये शेर बहादूर देउबा यांना पुढील पंतप्रधान केले जावे. यामुळे संसद बरखास्त करणाऱ्या के.पी. ओली यांना धक्का बसलाय.

के.पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील ५ महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा संसदेत बहुमत गमावले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने नवीन सरकार बनविण्याचे आदेश दिलेत.

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयातील ५ सदस्यांच्या पीठाने हे आदेश दिलेत. २८ तासांच्या आत नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांना पंतप्रधानपदी नियुक्त केले जावे, असे म्हंटलं आहे.

नेपाळचे राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मे महिन्यात नेपाळची 275 सदस्यांची संसद भंग केली होती. यानंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची घोषणा केली होती. राष्ट्रपतींच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्य न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल केल्या होत्या.

विरोधकांनी न्यायालयामध्ये 30 हून अधिक याचिका दाखल केल्या होत्या. यात राष्ट्रपतींचा आदेश चुकीचा असल्याचे म्हंटलं होते. यामुळे नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबायांना पंतप्रधान केलं जावे, अशी मागणी त्यांनी या याचिकांद्वारे केली होती. यावर सुमारे १५० खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.