राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीसोबतच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही जोरदार हालचाली सुरू आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने तिसरा उमेदवार या निवडणुकीत दिला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवाजिराव गर्जे हे राष्ट्रवादीचे तिसरे उमेदवार म्हणून लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
शिवाजीराव गर्जे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी मुंबई कार्यालय सांभाळतात. त्यांना विधानपरिषदेचे तिकीट राष्ट्रवादीने दिले आहे. विधानपरिषदेसाठी शिवाजीराव गर्जे हे आता राष्ट्रवादीचे तिसरे उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणूकीप्रमाणेच मोठी उत्सुकता विधानपरिषदेच्या निवडणुकीतही निर्माण झाली आहे.