TOD Marathi

निर्मिती सावंतच्या सूनबाईंना पाहिलंय का? अतिशय सुंदर आणि एका कंपनीची मालकीण

संबंधित बातम्या

No Post Found

 

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांचं नाव अतिशय आदराने आणि प्रेमाने घेतलं जातं. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमातून निर्मिती सावंत यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. निखळ हास्य आणि आगळं वेगळं व्यक्तिमत्व त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा होत असते. (Nirmiti Sawant on social media)

कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, हप्ता बंद, कॉन्स्टेबल कामना कामतेकर या त्यांच्या मालिका खूप गाजल्या. निर्मिती सावंत लवकरच ‘किचन कल्लाकार’ (kitchan kallakar) या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. मात्र, त्यांच्यासोबतच त्यांच्या सूनबाईंचीदेखील हजेरी लावणार असल्याची चर्चा रंगली आहे. फू बाई फू, जाडूबाई जोरात या मालिकांमध्ये झळकलेल्या निर्मिती सावंत यांची सूनदेखील एक उत्तम कलाकार आणि एका कंपनीची मालकीण आहे.

निर्मिती सावंत यांच्या मुलाने अभिनय सावंतने (Abhinay Sawant) पूर्वा पंडित (Purva Pandit) हिच्यासोबत लग्न केलं आहे. अभिनय देखील आपल्या आईप्रमाणेच एक उत्तम अभिनेता आहे. तर, पूर्वा एक डुडल आर्टिस्ट (Doodle )म्हणून ओळखली जाते.

पूर्वा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमधील काही घडामोडीही ती चानेहमी हत्यांसोबत शेअर करत असते. पूर्वाची स्वत:ची एक कंपनी आहे. त्यामुळे ती स्वत: तिच्या हाताने डूडल्स तयार करत असते. पूर्वाने आपल्या सासूबाई म्हणजेच निर्मिती सावंत यांच्यासोबतही अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.