दसरा मेळावे पार पडले. मात्र, दसरा मेळाव्यानंतर तापलेलं वातावरण काही शांत होण्याचं नाव घेत नाही. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला असा आरोप उद्धव ठाकरेंवर करण्यात आला त्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीकास्त्र सोडलं.
- शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवावर बोलायला लाज वाटत नाही?
- उद्धव ठाकरे काहीही न करता संपत्तीचे मालक.
- बाळासाहेब ठाकरे असते तर असं कधीच झालं नसतं.
- उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा.
- दसरा शुभ बोलायचं पण ठाकरे केवळ अशुभ बोलतात.
- कोरोना काळात सामनांना 42 कोटी गुंतवले आणि 11 कोटी कमावले.
- सामनाचे उत्पन्न काय? उद्धव ठाकरेंचे उत्पन्नाचे साधन काय?
- मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी होत आहे. याला जबाबदार उद्धव ठाकरे आहेत.
- उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी काय केलं?