राज्यात दसरा मेळावे झालेत, दसरा मेळावे (Dasara Melava Maharashtra) झाल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीवरून राजकीय वातावरण मात्र अजूनही तापलेलं आहे. दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात (Uddhav Thackeray Dasara Melava in Shivaji Park) पार पडला तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला. (Eknath Shinde Dasara Melava in BKC Ground) यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सह त्यांच्या आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde Son of Eknath Shinde) यांच्या लहान मुलावर उद्धव ठाकरेंनी टीका केली असा आरोप शिंदे गटाच्या वतीने करण्यात येतोय. दीड वर्ष वय असणाऱ्या रुद्रांशवर टीका केल्याने अनेकांनी त्याचा निषेध केला.
यामध्ये आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उद्धव ठाकरे (BJP Leader Chitra Wagh criticized Uddhav Thackeray) यांच्या भाषणावर टीका केली आहे. ‘शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात’ अशा शब्दात चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
“पद वाटताना माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षाच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात. महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या स्तरावर कधीच गेलं नव्हतं, ज्यांनी नेलं त्यांचा निषेध करावा तितका कमीच आहे.” असेही चित्रा वाघ म्हणाल्या. “जेव्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची वेळ आली तेव्हा शिवसैनिक सोडून मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतलं. मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून पक्षाध्यक्षपद ही स्वतःकडे ठेवलं. शिवसैनिक सोडून आपल्या मुलाकडे मंत्रिपद दिलं. एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच आपल्या पत्नीकडे संपादकपद दिलं, ते एकनाथ शिंदेंच्या नातवावर टीका करत आहेत. अशा राजकारणाचा निषेध करावा तितका कमी आहे.” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं.
शिवसैनिक सोडून स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद,
मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून स्वतःकडेच पक्षाध्यक्षपद
शिवसैनिक सोडून मुलासाठी मंत्रिपद
एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच संपादकपद
पदे वाटताना‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात pic.twitter.com/YuBYph0PpR— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 7, 2022
यापूर्वीच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske criticized Uddhav Thackeray) यांनी देखील नाव न घेता उद्धव ठाकरेंवर याच संदर्भात टीका केली होती. शिंदे गटाच्या अन्य नेत्यांकडूनही यासंदर्भात उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंनी (DCM Devendra Fadnavis asked to take words bak to Uddhav Thackeray) आपले शब्द मागे घेतले पाहिजेत, असं म्हणत निशाणा साधला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे स्वतः किंवा त्यांच्याकडून या संदर्भात कोण आणि काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुकत्याचं ठरेल.