गडचिरोली:
पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सिटी वन (Tiger CT1) वाघाने अक्षरशः धुमाकूळ माजवली होती. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये वावरत असताना जवळपास 19 लोकांचा बळी घेतला होता. यामुळे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणात मोठी दहशत पसरली होती. शेतकरी आपल्या शेतावर जाण्यासाठी देखील घाबरत होते, अशा परिस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोंबिंग ऑपरेशन (Nana Patole demanded Combing operation to capture tiger CT1) राबवून या वाघाला जेरबंद करा अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर स्थानिक शेतकरी यांनी देखील या वाघाचा बंदोबस्त लावण्याची मागणी केली होती.
या नरभक्षी वाघाने जवळपास 19 बळी घेतल्यानंतर वनविभागाचे दोन पथक या वाघाच्या मागावर होते. त्यापैकी एका पथकाने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा परिसरात या वाघाला जेरबंद केले आणि शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. गेल्या काही दिवसात शेतकरी आपल्या शेतावर पिकाची पाहणी करायला गेला असताना या वाघाने काही शेतकऱ्यांवर हल्ला केला होता. त्यात काहींचा जीवही गेला होता. त्यानंतर अनेक लोक शेतावर जायला घाबरत होते.