मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. इतरांना पकडणारे आता स्वत: बचावासाठी प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
२ ऑक्टोबरनंतर परिस्थिती बदलली आहे. जो व्यक्ती आर्यनला तुरुंगात घेऊन जात होता. तो आता तुरुंगात आहे. जो व्यक्ती आर्यनला जामीन मिळू नये म्हणून शक्तीपणाला लावत होता. तो काल कोर्टात दाद मागत होता, आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक बोलत होते.
संपूर्ण सिक्वेन्स बदलला आहे. धरपकड करणारे आता बचावाचा मार्ग शोधत आहे. म्हणून मी काल म्हटलं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असा इशारा मलिक यांनी दिला. मी एका दाढीवाल्याचं नाव घेतलं होतं. या दाढीवाल्याचं नाव काशिफ खान असं आहे. तो त्या पार्टीत होता. फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. तो सेक्स रॅकेट चालवतो. तो समीर वानखेडेंचा मित्रं आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही? असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला.