TOD Marathi

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच G20 शिखर परिषदेसाठी रोमला पोहोचणार आहेत. दरम्यान जवळपास १२ वर्षांनी भारतीय पंतप्रधान रोमला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी रोमला पोहोचतील. अशी माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान मोदी रोममध्ये या महामारीत जागतिक आर्थिक आरोग्य सुधारण्यावर चर्चा करतील. मोदी २९-३१ ऑक्टोबर दरम्यान रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट देणार आहेत आणि नंतर यूकेला जाणार आहेत. ब्रिटनमधील ग्लासगो येथे पंतप्रधान मोदी हवामान बदलाच्या मुद्द्यांवर बोलणार आहेत.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा इटलीची राजधानी रोमचा हा पहिलाच दौरा आहे. यासंबंधी इटलीतील भारताच्या राजदूत नीना मल्होत्रा यांनी माहिती दिली आहे. याठिकाणी पोहोचल्यानंतर काही तासांनी, मोदी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गांधी पुतळ्याला भेट देणार आहेत. आणि नंतर साडेपाच वाजता इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी यांची मोदी भेट घेणार आहेत.