शरद पवारांना डॉक्टरेट ऑफ सायन्स मानद पदवी; राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून पदवी प्रदान

अहमदनगर: जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातर्फे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज गुरुवारी डॉ. नानासाहेब पवार सभागृहात ३५ व्या पदवीदान समारंभ पार पडला.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. या समारंभात डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने मला सन्मानित करण्यात आले. या बहुमानासाठी मी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो अशा भावना यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

Leave Your Comment