TOD Marathi

अभिनेत्री मुक्ता बर्वेची (Mukta Barve) मुख्य भूमिका असलेल्या ‘वाय’ चित्रपटाचा ट्रेलर ( Y Movie trailer ) नुकताच प्रदर्शीत झाला आहे. येत्या २४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शीर्षक असलेल्या ‘वाय’ या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. अजित सूर्यकांत वाडीकर ( Suryakant Wadikar ) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेने देखील या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

‘ती’चा लढा ‘ती’च्या अस्तित्वासाठी..
कारण, भीतीपेक्षा मोठे कर्तव्य आहे.

असं कॅप्शन तिने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला दिले आहे. (Latest Marathi Movie)

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

या चित्रपटात मुक्ता बर्वे ( Mukta Barve) एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडतात. या घटना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी का घडत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत, ज्यातील काही हात मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. आणि या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे.

यामध्ये तिला यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना मिळणार आहेत. मुक्तासोबत या चित्रपटात प्राजक्ता माळी, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण,नंदू माधव, सुहास शिरसाट, संदीप पाठक ही कलाकार मंडळीदेखील दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांना मात्र या चित्रपटाची जास्तच उत्सुकता लागली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज