TOD Marathi

वटपौर्णिमेचा एपिसोड कॉपी केला; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ झाली पुन्हा एकदा ट्रोल

हिंदू धर्मात पशू पक्ष्यांसह झाडांना एक विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली केली जाते. वटवृक्षात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश वास असतो, असं मानलं जातं. त्याचबरोबर वटवृक्षाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, त्यामुळे हिंदू धर्मात वटवृक्षाला खूप महत्त्व आहे. समस्त महिला वर्ग या सणाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. मनोरंजन क्षेत्रातील मालिका विश्वात देखील ‘वटपौर्णिमा स्पेशल’ (Vat Purnima in Marathi Serials) एपिसोड दाखवण्यात येत असतात. अलीकडेच बराचश्या मालिकांमधील प्रमुख पात्रांची लग्न झाली आहेत. याच मालिकांमधील नव्या जोड्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा असणार आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेमध्ये देखील नेहा यशचं अगदी काही दिवसांपूर्वीच अगदी धुमधडाक्यात लग्न झालं. येणारी वटपौर्णिमा ही नेहाची पहिलीच वटपौर्णिमा आहे. या भागात नेमकं काय होणार, नेहा यश कश्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करणार यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतानाच नेटकऱ्यांनी मात्र या मालिकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे.

 

सोशल मीडियावर नेहा आणि यश आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करत असल्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. वटपौर्णिमेचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये यश नेहाला उचलून घेऊन वडाला फेऱ्या मारताना दिसतो. यावरुनच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या चाहत्यांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath)ला ट्रोल केलं आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ची या मालिकेतील वटपौर्णिमेचा एपिसोडकॉपी केल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत मालिकेला ट्रोल केल आहे.

 

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या ‘वटपौर्णिमा’ स्पेशल एपिसोडमध्ये मानसी आणि अनिलचं तोंडघशी पाडून गौरी-जयदीप एकत्र येणार. या मालिकेत जयदीप गौरीला उचलून घेतो आणि वडाला फेरे मारतो. त्यामुळे दोन्ही मालिकांमधील एपिसोडमध्ये जवळजवळ साम्य आढळून आले आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्ग ‘माझी तुझी रेशीमगाठ’ला ट्रोल करत आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या वटपौर्णिमा स्पेशल भागाचा व्हिडिओ ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेआधी प्रदर्शित झाल्याचं बोललं जातंय.