TOD Marathi

सध्याच्या काळात छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची रेलचेल सुरु असल्याचं पाहायला मिळतं. यातलीच एक मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

त्यामुळे हे कलाकार प्रेक्षकांना त्यांच्याच घरातील सदस्य असल्याचं वाटतात. विशेष म्हणजे प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन व्हावं यासाठी हे कलाकार दिवसरात्र मेहनत करत असतात. मात्र, या धक्काधक्कीच्या जीवनात काही तरी विरंगुळा हवा यासाठी हे कलाकार सेटवरी मज्जा मस्ती करताना दिसतात.

सध्या सोशल मीडियावर शालिनी आणि मल्हार (Shalini and Malhar) या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही रोमॅण्टिक अंदाजात (Romantic Mood) दिसत असून त्यांनी मजेचा भाग म्हणून हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या ‘गुन गुना रहे हैं भवरे’ या गाण्यावर थिरकतांना दिसत आहेत.

https://www.instagram.com/reel/Cec9HOgKAob/?igshid=YmMyMTA2M2Y=

दरम्यान, कायम शालिनीच्या मुठीत राहणारा मल्हार पहिल्यांदा अशा रोमॅण्टिंक अंदाजात दिसत असल्यामुळे प्रेक्षकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या मालिकेत शालिनी ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकरने (Madhavi Nimkar) साकारली आहे. तर, मल्हारच्या भूमिकेत कपिल होनराव (Kapil Honrao) झळकला आहे.