खासदार राजीव सातव यांचे पुण्यात निधन; सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो विषाणू म्हणजे काय?

टिओडी मराठी,मुंबई, दि. 16 मे 2021 – काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गाानंतर उपचारादरम्यान पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो विषाणू आढळून आला होता. हा विषाणू नवीन प्रकारचा आहे. सामटोमॅजिलो विषाणू नेमका काय आहे? याविषयी माहिती असणं गरजेचं आहे.

सायटोमॅजिलो हा सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेतील 40 वर्ष पूर्ण असलेल्या सुमारे निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात तो आढळला होता. हा विषाणू संसर्गित व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलेल्यांकडे लाळ किंवा थुंकी द्वारे प्रसारित होतो. या विषाणूच्या संसर्गामुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात.

ज्या व्यक्तींची रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे, ते या विषाणूच्या संसर्गावर मात करु शकतात. रोग प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्यांवर या विषाणूचा प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकारशक्ती कमजोर असते, त्यांना हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

सायटोमॅजिलोची प्राथमिक लक्षणं म्हणजे रुग्णामध्ये बदल जाणवतो. डोकेदुखे, श्वास घेताना कमतरता जाणवते, ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणं आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्ग झालेला आहे की नाही? हे पाहण्यासाठी रक्त चाचणी करावी लागते.

सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांत देखील आढळतो. याशिवाय गर्भवती महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो. सायटोमजिलो झाला आहे की नाही? हे तपासण्यासाठी रक्त चाचणी आणि इतर मार्गांचा वापर करतात.

Please follow and like us: