TOD Marathi

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत येणार मुलचेरा या गावात एका नवीन उपक्रमाला सुरुवात झाली आहे (A new initiative has started in the village of Mulchera in Aheri Assembly in Gadchiroli district). सकाळी ८ वाजून ४५ मिनिटाआधी काही वेळ देशभक्तीपर गाणं वाजतो. घड्याळाचा काटा ८ वाजून ४५ मिनिटांवर येताच ‘परेड सावधान… एक साथ राष्ट्रगीत सुरू कर’ अशी सूचना येताच गावातील लोक असतील त्या परिस्थितीतून सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगीताला सुरुवात करतात. आजूबाजूने जाणाऱ्या वाहनांना पण तिथेच ब्रेअक लागतो. राष्ट्रगीत संपलं की सगळे ‘भारत माता की जय’ असा एकच जयघोष करतात आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दुकानदार आपले दुकान उघडतात आणि बाजारपेठा सुरू होतात.

राष्ट्रीय प्रेरणा घेऊन दुकान उघडण्याची सुरुवात नेमकी झाली तरी कशी? हा प्रश्न तुम्हाला पण नक्कीच पडला असलं. तर तालुका मुख्यालयात असलेल्या मुलचेरा पोलीस स्टेशन येथे काही महिन्यापूर्वी रुजू झालेले ठाणेदार अशोक भापकर (Thanedar Ashok Bhapkar) यांनी १५ ऑगस्ट २०२२ पासून या उपक्रमाला सुरुवात केली. १५ ऑगस्ट पूर्वीच त्यांनी याविषयी व्यापारी वर्ग, युवा पिढी, तसेच पत्रकार बांधवांसोबत निसंकोच चर्चा करून सदर उपक्रमाला सुरुवात करण्याचा ठरवलं होतं. दररोज सकाळी राष्ट्रगीत गाण्याने जनतेमध्ये देशभक्ती वाढेल आणि समाजातही एकोपा निर्माण होईल या उद्देशाने सर्वांनीच या निर्णयाचा स्वागत केला.

एखाद्या शाळेच्या किंवा हायस्कूलच्या परिपाठाप्रमाणे मुलचेरा गावाने हा उपक्रम १५ ऑगस्ट २०२२ पासून अखंड चालू ठेवला आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून गावात भांडण तंटे कमी झाले आहेत तसेच गावातील लोकांची काम करण्याची क्षमता आणि उत्साह यामध्ये सुद्धा लक्षणीय बदल झाला आहे. मुलचेरा गाव हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत समाविष्ट असून असून कदाचित महाराष्ट्रातील हे एकमेव गाव असेल जिथे राष्ट्रगीताने दिवसाची सुरुवात होते. हा सन्मान गडचिरोलीकारांना मिळाला असून मुलचेरा गावाची लोकप्रियता वाढत आहे.