राज्यसभा निवडणुकीबाबत छत्रपती संभाजीराजे यांचं अद्याप निर्णय स्पष्ट झाला नसल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी संजय पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शिवसेनेने संभाजीराजेंना डावलल्यानंतर मनसेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसंच शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील यांनी यासंबंधी ट्विट केलय.
काय म्हणतात मनसे आमदार राजू पाटील?
“राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ? प्रत्येक गोष्टीत राजकारण केलंच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे.”
राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) May 23, 2022