TOD Marathi

अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. शिवाय तिच्या कामाच्या अपडेट देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर चंद्राची क्रेझ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चंद्राप्रमाणे चंद्रमुखी (Chandramukhi Marathi Movie) सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकरची ( amruta khanvilkar ) मैत्रीण शेवंताने देखील सर्वांचे लक्षवेधून घेतले. शेवंताची भूमिका अभिनेत्री राधा सागर हिनं साकारली आहे. आतापर्यंत राधा सागरला नकारात्मक भूमिकेत पाहिलं आहे. राधाने ( radha sagar ) नुकतीच इन्स्टावर एक पोस्ट केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. राधा सागरनं अमृता खानविलकरसोबतचा एक फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, “शेवंता” सारखं कॅरेक्टर मला करायला मिळाले हे मी माझं भाग्य समजते, “अमृता” बद्दल काय बोलू?

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

सगळ्यात शेवटी राधानं प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचे धन्यवाद देखील मानलं आहेत. तिच्या या पोस्टवर अमृता खानविलकर, प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांनी पोस्ट करत तिचं देखील कौतुक केंल आहे.