TOD Marathi

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीतून (Maharashtra MLC Election) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज दाखल केला होता त्यांनीही अर्ज मागे घेतला. (Sadabhau Khot withdrawal form) महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागा रिक्त होत आहेत मात्र महा विकास आघाडीच्या वतीने एकूण 6 तर भाजपच्या वतीने अशे 11 उमेदवार आता रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे तर काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी हे सहा उमेदवार आहेत तर भाजपच्या वतीने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे पाच उमेदवार असणार आहेत. (5 BJP Candidates will contest MLC election)

राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) नुकतीच पार पडली. महाविकास आघाडी आणि भाजप अशा दोन्ही बाजूने निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली होती. (Mahavikas Aghadi vs BJP) त्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक यांच्यामध्ये सामना रंगला आणि भाजपने ती जागा जिंकली. या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता निवडणूक होणार हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत पराभव झालेली महाविकास आघाडी आपले सहाही उमेदवार निवडून येण्यासाठी काय प्रयत्न करते किंवा राज्यसभा निवडणुकीत मिळालेला विजय विधान परिषदही निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपा काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.