TOD Marathi

टिओडी मराठी, सातारा, दि. 6 मे 2021 – सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत काल सकाळी अंतिम सुनावणी झाली, यावेळी महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर मराठा आरक्षण रद्द झाल्याबाबत अनेक नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षण रद्द केल्याने सातारा जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. आज (गुरुवार) राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर शेणकुटे पेटवून निषेध व्यक्त केलाय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सर्व प्रकारानंतर घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केलीय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद आ शशिकांत शिंदे यांनीही या प्रकाराचा निषेध नोंदवलाय. तसेच राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावरही अज्ञातांनी दगडफेक केली आहे.