TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 26 मे 2021 – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. त्यानंतर मराठा समाजात अस्थिर वातावरण निर्माण झालं आहे. याबद्दल केंद्र सरकारने सर्वोच्च न्यालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असताना महाराष्ट्रात आता आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.

मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे. त्यातच आता भाजपचे अन्य मराठा नेतेही राज्यभर दौरा करणार आहेत.

प्रत्येक नेता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन मराठा आरक्षणाबाबत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. यामुळे भाजपच्या या ‘मराठा अस्त्राला’ किती पाठिंबा मिळतो? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

काय सांगणार भाजप नेते ? :
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे मराठा नेते राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा समाजास भाजपची भूमिका सांगतील. तसेच, आतापर्यंत कोर्टात काय घडले?, सरकार कुठे चुकलं? आदी मुद्दे सुद्धा भाजपचे नेते मराठा समाजासमोर मांडतील.

कोणते नेते करणार दौरा :
भाजपचे खासदार नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, नरेंद्र पाटील आदी नेते जिल्हावार दौरा करणार आहेत. हे नेते त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्षाची भूमिका मांडण्याचे काम करणार आहेत.

कोणाला दिला कोणता जिल्हा :
आशिष शेलार – नांदेड, बीड
नारायण राणे – पुणे, ठाणे
हर्षवर्धन पाटील – सातारा
प्रसाद लाड – रत्नागिरी
रवींद्र चव्हाण – सिंधुदुर्ग
नरेंद्र पाटील- अकोला, बुलढाणा
संभाजी पाटील निलंगेकर – औरंगाबाद, जालना