मुंबई :
केंद्र सरकारने देशातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया ही महत्वकांक्षी योजना राबवली. त्याच धरतीवर आता राज्य सरकारने देखील राज्यातील वातावरण क्रीडामय करण्यासाठी एका स्पर्धेची घोषणा केली. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज ‘महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स’ची घोषणा केली. या महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्सचे आयोजन महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्यामार्फत 2022 मध्ये करण्यात येणार आहे. याबाबतची तारीख मात्र अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
याबाबत डीजीपीआरने ट्विट केले की, ‘राज्यात क्रीडामय वातावरण तयार करून विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी राज्यात ‘महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स’ चे आयोजन करण्यात येणार आहे. हे आयोजन महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे 2022 मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्र सुनिल केदार यांनी दिली.
राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी राज्यात ‘महाराष्ट्र स्टेट #ऑलिम्पिक गेम्स’ चे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे २०२२ या वर्षामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री @SunilKedar1111 यांनी दिली. pic.twitter.com/JWK5U32dVI
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 3, 2022
यामुळे राज्यातील खेळाडूंना आणखी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे