TOD Marathi

अयोध्येत आम्ही राजकारण करण्यासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलोय.  राजकीय विषय काढणं उचित नसेल. आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे, त्यामुळे अयोध्येला (Ayodhya )  राजकारणासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत असं राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray )  म्हणाले. अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार असल्याचंही  म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेमध्ये ( Mumbai Municipal Corporation 0 रामराज्य येणार असल्याचा विश्वासही ठाकरेंनी यावेळेस  व्यक्त केला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन वर्षांनंतर अयोध्या दौऱ्यावर आलो आहे, उत्साह तोच आहे. माझ्यासोबत सर्व शिवसैनिक आले आहेत. इथे आम्ही राजकारण करायला आलो नाही, आम्ही तिर्थयात्रेला आलो आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले. अयोध्येत 100 खोल्यांचे महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत अशी माहिती राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते ( Shivsena Leader )  आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.