TOD Marathi

‘बिग बाॅस’ मराठी सिझन 2 ( Big Boss Marathi Season 2 ) मुळे घराघरात पोहोचलेले अभिजीत बिचुकले (Abhijeet bichukale) यांनी नुकतंच ‘झी मराठी’वरील ‘किचन कल्लाकार’ (Kichean Kallakar ) या कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे अभिजीत बिचुकले ( Abhijit Bichukale ) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

‘किचन कल्लाकार’ शो वेळी एका खेळा दरम्यान ड्रोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो दाखवला असता “हे तर आमच्या गावाकडचे तात्या एकदम चांगला माणूस” असं विनोदी वक्तव्य बिचुकले यांनी केलं आहे. ड्रोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांच्यावर केलेल्या मिश्कील टिपण्णीमुळे सेटवर उपस्थित असलेल्यांना हसू आवरणं अशक्य झाल्याचं पाहायला मिळालं.

या कार्यक्रमाला अभिजीत बिचुकले ( Abhijit Bichukale ), जयंत वाडकर ( jayant Wadakar ) आणि तृप्ती देसाई ( Trupti Desai ) यांनी हजेरी लावली. यांच्यामध्ये रंगणारी पाककलेची चुरस बघण्यासारखी असेल. किचन कल्लाकार’ हा शो प्रेक्षंकाच्या पसंतीस अगदी कमी कालावधी उतरला. या शाेमध्ये कलाकारापांसून ते नेते मंडळीपर्यत अनेकजण येऊन गेले आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करतो.