TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तपास यंत्रणेकडे आपल्यावर कारवाई करण्याइतपत पुरावे नसल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयामध्ये काही दिवसांपूर्वी अर्ज केला आहे. त्याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विरोध केलाय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोषमुक्त करण्यासाठी केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली आहे. त्यावेळी एसीबीने युक्तिवाद केलाय.

महाराष्ट्र सदनचे नूतनीकरणाचे काम कंत्राटदार के. एस. चमणकर इंटरप्रायझेस यांना दिलं होतं. त्यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाच दिल्याचे पुरावे एसीबीकडे आहेत, असे सांगितले आहे.

या याचिकेवरील सुनावणी 21 ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली आहे. तर, मूळ तक्रारदार अंजली दमानिया हस्तक्षेप करण्याची मागितली असता त्यांना न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यास सांगितले.

यादरम्यान, न्यायालयाने कृष्णा चमणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची दोषमुक्तता करताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुतणे, मुलगा किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना 13.5 कोटी रुपये दिल्याचा पुरावा नाही.

13.5 कोटी रुपयांचा अवाजवी फायदा आरोपी नंबर 1 (छगन भुजबळ) आणि 12 ते 17 (पंकज भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख, इराम शेख आणि संजय जोशी) यांच्यापर्यंत पोहचला आहे, असे न्यायालयाने म्हंटले आहे.