TOD Marathi

गणेशोत्सवात विसर्जनाचा शेवटचा मान असलेल्या दक्षिणेश्वर औसा हनुमान सांस्कृतिक गणेश (Dakshineshvar Ausa Hanuman Sanskrutik Mandal) मंडळने या वर्षी चक्रीभजनाचे आयोजन केले होते. नाथ संप्रदायाचे औसा येथील मठाचे पाचवे पिठाधीपती गुरूबाबा औसेकर महाराज यांच्यासह 50 पेक्षा जास्त वारकऱ्यांनी चक्रीभजन (Chakribhajan in Latur) सादर केले. औसा येथील या मठाचा 240 वर्षाचा इतिहास आहे. पायात चाळ, गळ्यात विणा आणि हातात चिपळ्या घेऊन डिमडीच्या साथीने गोल फिरत चक्रीभजन सादर केले जाते. या भजनात विठुरायाच्या नामात देहभान हरपून नृत्य केले जाते.

पंढरपूर (Chakribhajan in Pandharpur) येथे मागील 242 वर्षांपासून चक्रीभजनाची परंपरा औसेकर घराण्याकडून केली जाते. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये माघ शुद्ध तिसऱ्या दिवशी औसेकर घराण्यातून 242 वर्षांपासून भव्य दिव्य अशी चक्री भजनाची परंपरा आहे. माघ शुद्ध महिन्यामध्ये औसेकर घराण्याकडून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सेवार्थ चक्रीभजन केले जाते.

चक्रीभजन लातूर शहरातील 50 पेक्षा जास्त वर्षांपासून विसर्जनाचा शेवटचा मान असलेल्या दक्षिणेश्वर औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळात सादर करण्यात आले. गणेश उत्सवाचे पावित्र्य प्रत्येक गणेश भक्तांनी जपलं पाहिजे. समाजामध्ये आजही अनेक गरीब लोक आहेत. ज्यांना अंगभर कपडे नाहीत, पायात चप्पल नाही. अशा दिन दुबळ्यांची सेवा गणेश मंडळाच्या माध्यमातून केली गेली तरच तो खऱ्या अर्थाने देवाची आराधना केल्यासारखा आहे. असे मत गुरुबाबा औसेकर महाराज यांनी व्यक्त केले.