अमरावतीतून गांजाची तस्करी? पोलिसांच्या कारवाईत ४३५ किलो गांजा जप्त

अमरावती:
अमरावतीतून गांजाची मोठी तस्करी होत असल्याचे उघड झाल आहे. (Amravati) नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या कारवाईत तब्बल ४३५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश मधून अमरावतीत गांजाची मोठी वाहतूक होत होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी सापळा रचून गांजाची होणारी तस्करी हाणून पाडली आहे. यात ४ आरोपींसह ७४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून (LCB Amravati took action) ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

आरोपी व मुद्देमाल चांदूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. यासंदर्भात अधिक तपास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी करीत आहेत.

Leave Your Comment