“जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है…” ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर पाहिलात का?

मुूंबई : आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची घोषणेपासून ते आमिर खानच्या चित्रपटातील लुकपर्यंत सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

‘लाल सिंह चड्ढा’च्या ट्रेलरमध्ये आमिर खानच्या व्यक्तिरेखेचं बालपण ते तारुण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला दाखवण्यात आलं आहे की, आमिर खाननं साकारलेली व्यक्तिरेखा लाल सिंह चड्ढाला बालपणी चालताना समस्या होत असते. तसेच तो मानसिकरित्याही इतरांच्या तुलनेत वेगळा आहे.

या चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका अभिनेत्री मोना सिंह यांनी साकारली आहे. जी आपल्या मुलाला आयुष्यभरासाठी चांगली शिकवण देते. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत करते. याशिवाय या ट्रेलरमध्ये करीना कपूर खान आमिरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकरताना दिसत आहे. जी त्याच्याशी लग्न करायला नकार देते.

Please follow and like us: