पंढरपूर :
दोन वर्षानंतर पुन्हा एकदा पंढरीत वारकऱ्यांचा जनसागर उलटला आहे. (Ashadhi Wari after 2 years) पंढरी नगरी भक्तीच्या सागरात न्हावून निघाली आहे. वरुणराजा बरसत असतानाही प्रचंड उत्साहात त्याला न जुमानता पंढरीत आज 12 लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत. (More than 12 lakhs Warkari gathered in Pandharpur) या सर्वांच्या उपस्थितीत संपूर्ण पंढरी नगरी टाळ मृदंगांच्या गजरानं दुमदुमली आहे. वारकऱ्यांच्या नगर प्रदक्षिणेलाही सुरुवात झाली आहे.
विठूमाऊलीच्या दर्शनरांगेमध्येही लाखभर भाविक उभे आहेत. विठूरायाच्या दर्शनासाठी साधारणपणे 20 तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर यंदा वारीला परवानगी मिळाल्यानं लाखो भाविकांनी पंढरपूर दुमदुमलं आहे. एकीकडे पावसाचा जोर वाढला असला तरी वारकऱ्यांचा उत्साह मात्र कायम आहे. सकाळी पंढरपूरात मानाच्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दाखल झाल्या. (Sat Dnyaneshwar Maharaj, Sant Tukaram Maharaj palkhi) पंढरपुरात 65 एकर परिसरात पाच लाखांहून अधिक भाविकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.
शहरातील मठ, भक्तनिवास आणि घरोघरी वारकरी उतरले आहेत. मोकळ्या पटांगणात वारकऱ्यांच्या राहुट्यांसह वाहनांची गर्दी झाली आहे. आषाढी यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहे. परिसरात पाच हजार पोलीस, गृहरक्षक, राज्य राखीव दल यासह विशेष पथकं तैनात केली आहेत.
–