TOD Marathi

मुंबई : राज्याचे मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. विभास साठे यांचे मनसुख हिरेन होऊ नये, अशा आशयाचे पत्र किरीट सोमय्या यांनी पोलिस महासंचालकांना लिहिलं आहे.  राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरील कथित रिसॉर्ट प्रकरणी कारवाई सुरू झाल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत.

पत्रात सोमय्या म्हणतात की, विभास साठे यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी.

 

ईडीने 26 मे रोजी अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापा मारला होता. यामध्ये दापोलीतील रिसॉर्टची कथित विक्री परब यांना करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान, कार्यालयाचाही समावेश यात होता