TOD Marathi

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार असल्याचं जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे आज राज्यातील 14 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिका सह 14 महापालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत आज ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. कल्याण-डोंबिवली नागपूर कोल्हापूर या महापालिकांच्या सोडतीकडे सर्वांचेच विशेष लक्ष असणार आहे.

राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून जोपर्यंत राज्य सरकार ओबीसी जनगणनेची त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करत नाही. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी प्रभाग राखीव ठेवता येणार नाही. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसींचे आरक्षण शिवाय पार पडणार आहे. त्यामुळे आज सोडत असल्यानं इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली असणार एवढं मात्र नक्की.