भारतीय क्रिकेटमधील नाही तर जगातिक क्रिकेटमधील स्टार फलंदाज (Star Cricketer) विराट कोहली (Virat Kohli) याला नुकताच आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ (ICC PLAYER OF THE MONTH) पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे . T20 विश्वचषक(T20 World Cup 2022) स्पर्धेतील उत्तम कामगिरीची जणू ही पोचपावतीच मिळाली आहे. विराटसोबत वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करणारे आणखी दोन खेळाडूही नॉममिनेट झाले होते यामध्ये झिम्बाबवेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर (David Miller) यांचा समावेश होता पण विराटची खेळीही विराट असून आणि प्रेक्षकांच्या पसंतीमूळे विराटनं पुरस्कारावर नाव कोरले आहे.
कोहलीने 205 धावा नोंदवल्यानंतर आणि संपूर्ण ऑक्टोबरमध्ये त्याच्या फलंदाजीच्या प्रतिभेचे प्रदर्शन केल्यानंतर पुरस्कार साजरा केला. सिडनीमध्ये नेदरलँड्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावण्याबरोबरच, त्याने T20 विश्वचषक स्पर्धेत मेलबर्नमधील गर्दीसमोर पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवून अविस्मरणीय खेळी केली.
“ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून मान मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. जगभरातील चाहत्यांनी तसेच पॅनेलने उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केल्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी आणखी खास बनते,” अशी प्रतिक्रीया आयसीसीच्या ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पारितोषिक मिळाल्यानंतर विराट कोहलीने दिली. भारताला T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात कोहलीच्या प्रयत्नांचा मोलाचा वाटा आहे.