TOD Marathi

करण जोहर बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहे, जो चित्रपटांव्यतिरिक्त वादांमुळेही नेहमी चर्चेत असतो. करण काहीही करत नसला तरीही तो वादांचा भाग बनतो आणि म्हणूनचं त्याचे नाव ट्विटरवर नेहमीच ट्रेंड करत असते. मध्यंतरी करण जोहरला पुन्हा नेटिझन्सने ट्रोल केलं होत. ब्रह्मास्त्र सिनेमाच्या पार्ट 2 कडे लक्ष दे असं एका नेटिझनने कमेंट केली.या वरुन असं दिसतं ट्रोलर्सने करण जोहरची पाठ सोडलेली नाही (Karan Johar Twitter)

मात्र, या सगळ्यानंतरही करण जोहर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याच्या आयुष्याशी निगडीत छोट्या-छोट्या गोष्टी इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर पोस्ट करत असतो. पण आता करण जोहरने अचानक ट्विटरचा निरोप घेतला आहे. करणच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते हैराण झाले आहेत. आणि त्याबरोबर करण जोहरला या निर्णयामुळे ट्रोल करण्यात येत आहे (Karan Johar Quits Twitter)

करण जोहरने ट्विटर सोडण्याआधी काही वेळापूर्वी शेवटचे ट्विट केलं होत, ज्यामध्ये त्याने आपल्या प्रियजनांचा निरोप घेतला आणि त्यांच बरोबर करणने आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी आणखी सकारात्मक उर्जेसाठी जागा निर्माण करत आहे आणि हे त्या दिशेने एक पाऊल आहे. गुडबाय ट्विटर! करणने अचानक अशा प्रकारे ट्विटर सोडने लोकांना ते आवडत नाही आहे. आणि याच सर्व कारणामुळे करण ट्विटर सोडल्यावरही ट्विटर वरच ट्रेंड करत आहे.

दिग्दर्शक करण जोहर आणि ट्रोलिंग हे जणू समीकरणच बनले आहे. मग करण जोहरचे कपडे असो किंवा त्याने केलेले वक्तव्य किंवा नेपोटिझममुळे करणला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता मात्र या ट्रोलिंगला कंटाळूनच की काय करण जोहरने ट्विटरला गुडबाय म्हटलं याचा अंदाजा लावला जात आहे.