TOD Marathi

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरेंची भेट घेतली. (Maharashtra Congress President Nana Patole and met former CM Uddhav Thackeray) सोमवारी सकाळपासून या भेटीची चर्चा सुरु होती. संध्याकाळच्या सुमारास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, (Mumbai Congress President Bhai Jagtap) माजी मंत्री अमित देशमुख आणि काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक पार पडत आहे आणि या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य घटक पक्ष शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देतील का? याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, काँग्रेसच्याही वतीने काही वक्तव्य करण्यात आली होती. मात्र, याच निमित्ताने नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आणि यावर आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती आहे.

ऋतुजा लटके यांना काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असेल, त्यांच्या विजयासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. (MP Vinayak Raut talks on Andheri East Bye election) त्यामुळे आता ऋतुजा लटके यांना काँग्रेसचा पाठिंबा असणार आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, काँग्रेसने ऋतुजा लटके यांना पाठिंबा देत असताना केवळ महाविकास आघाडीचा धर्म म्हणून पाठिंबा दिला की त्या बदल्यात काही समीकरण जुळवून घेतलं याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कारण येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसलाही वाटते की आपल्या जागा वाढल्या पाहिजेत तर त्या ठिकाणी कसं नियोजन असेल किंवा त्या संदर्भातली काही चर्चा करण्यात आली का? यासंदर्भात मात्र माहिती मिळू शकली नाही.