महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे, शिंदेंचं नवं ट्वीट

मुंबई : 

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सत्तांतराचं वादळ सुरू झालं आहे. आणि ते काही केल्या शांत होताना दिसत नाही आहे. संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून बंडखोर म्हणून चर्चेत आलेल्या एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) एक सूचक ट्वीट केले आहे. एकनाथ शिंदे यांचे हे दिवसभारातील दुसरं ट्वीट असून, यामध्ये त्यांनी चार मुद्द्यांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Eknath Shinde News)

एकनाथ शिंदे ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणाले ?

  1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला.
  2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
  3. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
  4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याच्या थेट मत व्यक्त केले आहे. (Eknath Shinde Tweet)

त्यापूर्वी शिंदेनी एक ट्वीट केले होते. शिंदे यांना गटनेते पदावरून हटवल्यानंतर शिवसेनेकडून शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिंदेच्या या ट्वीटमुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद शिगेला पोहचला असल्याचे म्हटले होते. (Eknath Shinde New Tweet News)

Please follow and like us: