…तर मी आनंदाने राजीनामा द्यायला तयार, शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री ठाकरे पहिल्यांदाच बोलले

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज जनतेशी संवाद साधला. एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आणि मला खुर्चीचा मोह नाही, शिवसैनिक मुख्यमंत्री होत असेल तर आनंदच आहे असही म्हटलं. (Uddhav Thackeray spoke)

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे,

◆ शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांच्यात गुंफलेलं

◆ समोर येऊन सांगावं की मी पदासाठी योग्य नाही.

◆ राजीनाम्याचं पत्र तयार ठेवलंय. मला सत्तेचा मोह नाही.

◆ माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल, तर काय करायचं?

◆ माझ्यासोबत शिवसैनिक आहे, तोपर्यंत कोणतेही आव्हान स्वीकारेन.

अशा विविध मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आज आपलं मत व्यक्त केलं.

Please follow and like us: