TOD Marathi

पैलवानच्या हत्येप्रकरणी Judo प्रशिक्षक गजाआड; Delhi पोलिसांकडून 11 वा आरोपी Arrested

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 16 जून 2021 – मागील महिन्यात राजधानी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये राष्ट्रीय कुस्तीपटू सागर धनकड यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुभाष नावाच्या जूडो प्रशिक्षकाला बुधवारी अटक केलीय. या प्रकरणात अटक केलेला हा अकरावा आरोपी आहे. हा प्रमुख आरोपी कुस्तीपटू व दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुभाषला दिल्ली येथून अटक केली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीय.

सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपाखाली ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार सध्या दिल्लीतील मंडोली तुरुंगामध्ये आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात आतापर्यंत गँगस्टर कनेक्शन समोर आलंय.

४ आणि ५ मे रोजीच्या रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमार आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पोहोचला. तिथे त्याने मारहाण केली. या मारहाणीत पैलवान सागर धनखड गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर सुशील कुमार फरार झाला होता.

या दरम्यान, १७ दिवसांनंतर २३ मे रोजी सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. या हत्याकांडाशी संबंधित अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरूय.