टिओडी मराठी, दि. 16 जून 2021 – प्रत्येकजण जेवणात भात खातो. काहींना भाताशिवाय जेवण जात नाही. पण, भात कसा शिजवायचा? याची एक पद्धत आहे. कारण, जर योग्य पद्धतीने शिजवला गेला नाही तर त्यातील विषारी द्रव्ये तशीच राहतात. अन त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे जाणून घेऊ, भात शिजवण्याची योग्य पद्धती, :
सायन्स ऑफ द टोटल एनर्वोमेंट येथील संशोधनानुसार भातात अर्सेनिक नावाचा घटक असतो, जो आपल्या शरीरासाठी घातक असतो. सफेद तांदळात ७४ टक्के अर्सेनिक असते.
जे विशिष्ट पद्धतीने तांदूळ शिजवल्यास बाहेर पडते. जर हे बाहेर काढले नाही तरपुढील दुष्परिणाम होऊ शकतात. यात, त्वचेच्या समस्या, कॅन्सरचा धोका, डायबेटीस, फुफ्फुसाचे रोग आदी.
भात शिजवण्याची पद्धत :
१.प्रथम एक वाटी तांदूळ घ्यावे.
२.त्यात चार वाटी पाणी टाकावे.
३.हे पाणी व्यवस्थित उकळून घ्यावे.
४.ते गाळून टाकावे.
५.त्यात पुन्हा दोन वाट्या पाणी टाका व नीट शिजवा.
या पद्धतीचे फायदे :
अशा पद्धतीने भात शिजवल्यामुळे भातातून सर्व विषारी द्रव्ये बाहेर फेकता येतात.
डायबेटीस व लठ्ठपणाची समस्या दूर होते.
लहान मुलांना अर्सेनिकच्या धोक्यापासून दूर ठेवता येते.
आणि भात कमी वेळात शिजतो.
More Stories
पुढचे १५ दिवस जमावबंदी लागू, मुंबई पोलिसांचा निर्णय!
अवघे काही तास बाकी असताना मलिक अन् देशमुखांच्या मतदानाच्या आशा मावळल्या…
‘हळद, मेहंदी आणि सात फेरे’; स्वतःशी लग्न करणाऱ्या तरुणीचा लग्नसोहळा संपन्न