TOD Marathi

Indian Navy मध्ये नोकरीची संधी ; पात्रता 10 वी पास, असा करा अर्ज

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 जुलै 2021 – भारतीय नौदलाने नाविक एमआर पदांवर भरतीचे आयोजन केलं आहे. यासाठी नौदलाने नोटिफिकेशन ही जारी केलं आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज 19 जुलैपासून करू शकतात. याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 ही आहे.

नौदलात या भरतीच्या माध्यमातून सेलर मॅट्रिक (१० वी) क्लास रिक्रुटमेंट शेफ, स्टिवॉर्ड व हायजिनिस्टच्या पदांसाठी एकून ३५० जागा भरल्या जाणार आहेत. पात्र पुरुष उमेदवार अधिकृत वेबसाईट www.joinindiannavy.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी इंडियन नेव्ही भरती 2021 नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक दिली आहे.

शैक्षणिक योग्यता : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे मान्यता प्राप्त बोर्डाकडून इच्छुक उमेदवार दहावीची परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयाची अट : 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 य़ा दोन तारखांमध्ये ज्यांचा जन्म झाला असेल तेच उमेदवार अर्ज करू शकतील.

यातील निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यांना या काळात 14,600 रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना लेव्हल तीन नुसार 21,700 रुपये – 69,100 रुपये या स्केलने पगार मिळणार आहे. याशिवाय त्यांना डीए व्यतिरिक्त 5200 रुपये दर महिना एमएसपी मिळणार आहे.

ही आहे शारिरीक योग्यता –
उंची : 157 सेमी
रनिंग: 1.6 किमी 07 मिनिटे
उठाबशा: 20
छाती : कमीतकमी 5 सेमी फुलविल्यानंतर

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा व मैदानी परीक्षेसाठी उमेदवार हे दहावीच्या मार्कवर निवडले जाणार आहेत. कट ऑफ एका राज्या राज्यांत वेगवेगळे असू शकतात. एकूण 350 जागा आहेत, यासाठी 1750 उमेदवारांना परीक्षांना बोलावले जाणार आहेत.