TOD Marathi

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर होते. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एमआयआएमच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सरकारवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी याशिवाय शिंदे सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही टोले लगावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जयंत पाटील यांनी राजकीय सल्ला देखील दिला आहे. (NCP State President Jayant Patil on Solapur Tour program)

जयंत पाटील शुक्रवारी सायंकाळी सोलापूर दौऱ्यावर होते. एमआयएमच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना राजकिय सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी कामाला लागलं पाहिजे. (CM Eknath Shinde) पूजा अर्चा, होम हवन करण्यासाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, असेही जयंत पाटील म्हणाले. सरकार चालवणं एवढं सोपं नसत.एखादा फोन करून एखाद्या व्यक्तीला पोलीस स्टेशन मधून सोडवणं म्हणजे सरकार चालवल्या सारखं नाही, असंही जयंत पाटील म्हटलं.

एकनाथ शिंदे संकटात असल्याने जाणारे लोक दहा वेळा विचार करत आहेत, असंही पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना घेऊन सत्ता स्थापन केली आहे. आधी तर मंत्रिमंडळच नव्हतं, आता मंत्रिमंडळ आहे तर खातेवाटप नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे हे संकटात आहेत, हे त्यावरुन लक्षात येत, असंही ते म्हणाले.