TOD Marathi

मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत आपण साजरा करत आहोत. त्यामुळे 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनाची तयारी जोरात सुरू आहे. यामध्ये आजपासून ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरूवात होणार आहे. (Azadi Ka Amrit Mahotsav) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त स्वातंत्र्यदिनाला खास बनवण्यासाठी केंद्र सरकार ‘हर घर तिरंगा’ मोहीम चालवली जात आहे. (Independence Day)

या मोहीमेअंतर्गत आजपासून लोक आपल्या घर आणि संस्थांवर तिरंगा फडकवतील. केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियाना अंतर्गत आजपासून आपल्या घर आणि संस्थांवर 13 ते 15 ऑगस्टपर्यंत तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं आहे.

‘हर घर तिरंगा’अभियानात पोस्ट विभागही राष्ट्रध्वजाची विक्री करत महत्वाची भूमिका निभावत आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाांना सांगितले आहे की, स्वातंत्र्य सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’अभियाना अंतर्गत आजपासून आपल्या घर आणि संस्थांवर 13 ते 15 ऑगस्टपर्यंत तिरंगा फडकावण्यात यावं.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी देशात तिरंगा उघड्यावर फडकवायचा असेल तर तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावायचा नियम होता. मात्र जुलै 2022 मध्ये सरकारने त्यात सुधारणा केली आणि आता लोक त्यांच्या घरी रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकवू शकतील.