TOD Marathi

ऑस्करकडून सन्मानित करण्यात आलेला ‘जयभीम’ ठरला पहिला भारतीय चित्रपट

पुणे: दाक्षिणात्य तामिळ अभिनेता सुर्याच्या ‘जय भीम’ या चित्रपटाला ऑस्करकडून विशेष सन्मानित करण्यात आल आहे. त्यामुळे ऑस्करकडून विशेष सन्मान मिळविणारा पहिला तामिळ चित्रपट ठरला आहे. या सन्मानामुळे भारतीयांची मान उंचावली आहे.
अमेझाॅन प्राईमवर ‘जय भीम’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जागतिक आणि भारतीय चित्रपटविश्वात चांगलीच चर्चा रंगली होती. सर्व स्तरातून त्या चित्रपटाचं कौतुकदेखील होत होतं. देशातील जातीय विषमता आणि आदिवासी जमातीला भोगाव्या लागणारा अत्याचार, त्याचबरोबर त्यांना जगावं लागणारं गुन्हेगारीचं जीवन, याचं वास्तव चित्रण चित्रपटात मांडण्यात आलं होतं.

ऑस्करच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर स्थान मिळवणारा ‘जय भीम’ हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला असून या चित्रपटाची निर्मिती अभिनेता सूर्याची आहे. यात अभिनेता सूर्याने आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या वकील चंद्रू यांची भूमिका साकारली आहे.

काही दिवसांपूर्वी IMDB ने 2021 मधल्या लोकप्रिय चित्रपटांची यादी जाहीर केली. यात ‘जय भीम’ चित्रपटाने पहिलं स्थान पटकावले. इतरही अनेक पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झाले. सोबतच या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.