TOD Marathi

मुंबई: सध्या सुपरस्टार सूर्या आणि प्रकाश राज यांनी अभिनीत केलेला जय भीम चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे. एकीकडे सिनेमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक सुरु असताना दुसरीकडे सिनेमातील एका सीनवरुन वाद देखील सुरु झाला आहे.

या चित्रपटातील एका सीनमध्ये एक वयस्कर माणूस हिंदीमध्ये बोलत आहे. त्यावर प्रकाश राज यांचं पात्र हिंदी ऐकूण भडकतं आणि त्या वयस्क व्यक्तीला कानाखाली लगावतो असा तो सीन आहे. कानाखाली लावताना त्या व्यक्तिला उद्देशून फक्त तमिळमध्ये बोला असंही सुनावतो. यावरुन काही यूजर्सनी आक्षेप घेतला आहे.

काही लोक मात्र अभिनेते प्रकाश राज यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. हा सिनेमाचा भाग आहे. यात हिंदी भाषेविरोधी असं काही नाही. लोकं चुकीच्या पद्धतीनं पाहात आहेत, असं काही लोक म्हणत आहेत. तो चित्रपटाचाच भाग आहे त्यामुळे त्यात काहीच गैर नाही असंही काही लोक म्हणत आहेत.