टिओडी मराठी, तेल अविव, दि. 4 जुलै 2021 – गाझा पट्ट्यातून सोडलेल्या बलून बॉम्बच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलच्या लढाऊ विमानांनी आज गाझा पट्ट्यात जोरदार हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या रॉकेट लॉंचिंग पॅडवर हे हवाई हल्ले केले आहेत, असे इस्रायलच्या प्रसिद्धी माध्यमांनी म्हंटलं आहे.
रविवारी गाझा सीमेजवळ ईशकोल प्रादेशिक परिषदेमध्ये आग लागल्यानंतर इस्रायलने हे हवाई हल्ले केले आहेत. ही आग गाझातून सोडलेल्या ज्वलनशीन बलूनमुळे लागली आहे, असे इस्रायलच्या अग्निशामक आणि मदतकार्याचे प्रवक्त्याने सांगितले आहे. इस्रायलच्या हवाई दलाने या आठवड्यात दुसऱ्यांदा गाझावर हवाई हल्ले केलेत.
इस्रायलने पूर्व जेरुसलेममध्ये सिलवानच्या नजीक एक पॅलेस्टाईन दुकान मंगळवारी पाडले. जारुसलेम या पवित्र शहरात बांधकामे करण्यासाठी परवाने देण्यामागे भेदभाव केला जात आहे, दावा निदर्शकांनी केला. त्यानंतर पोलीस- आंदेलकांत जोरदार धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूंमधील तणाव वाढलाय.