हैदराबाद: हैदराबाद येथील एका फार्मा कंपनीवर धाड टाकली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. हेटरो फार्मा असे या कंपनीचे नाव असून या कंपनीच्या सहा राज्यातील कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमरीत तब्बल १४२ कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टैक्सेजने दिलेल्या माहितीनुसार ६ ऑक्टोबर रोजी या कंपनीच्या एकूण ५० जागांवर छापेमरी करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ५५० कोटी बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली आहे. बुधवारी हेटरो फार्मा कंपनीच्या परिसरात आयटी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्याच सोबत या कंपनीचे अधिकारी व सीईओ यांच्या घरांची देखील झडती घेण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोनाच्या काळात ही कंपनी चांगलीच चर्चेत आली होती. कोरोनाच्या उपचारासाठी तेव्हा रेमेडिसविर आणि फेविपिरवीर सारख्या अनेक औषधी संदर्भात मोठे दावे या कंपनीने केले होते. या कंपनीचे कार्यालय भारत व्यतिरिक्त चीन, रशिया, मेक्सिको आणि इराण या देशांमध्ये देखील आहेत.