TOD Marathi

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली.

वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन हे देखील यावेळी उपस्थित होते. काही लोक माझ्या हलचालींवर लक्ष ठेऊन आहेत, असं वानखेडे यांनी जैन आणि पांडे यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. दोनजण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे.

वानखेडे यांनी यावेळेस काही धक्कादायक दावे केले आहेत, मात्र यावर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे हे प्रकरण फार गंभीर असल्याने यावर कुठलीही प्रतिक्रिया नाही देता येणार, असे त्यांनी सांगितले आहे.