TOD Marathi

नवी दिल्ली :

बुधवारचा दिवस उजाडला तो आयकर विभागाच्या (Income Tax Deparment) देशभरात सुरू झालेल्या कारवाईनं. आयकर विभागाकडून देशातील विविध ५० ठिकाणी आज छापेमारी करण्यात आली. अगदी दिल्लीपासून उत्तराखंड महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये आयकर विभागाची पथक पोचली आणि त्यांनी चौकशी सुरू केली आहे.

विभागाच्या सर्वात जास्त टार्गेटवर असलेलं राज्य आहे राजस्थान. राजस्थानातील जयपूर मध्ये अनेक व्यवसायिकांच्या कार्यालयावरही विभागाने छापेमारी टाकली आहे. त्यामुळे कर चुकवेगिरी केलेल्या व्यावसायिकांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.

तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असलेल्या राजेंद्र यादव(Rajendra Yadav) आणि माध्यान्ह भोजनाच्या कार्यालयावरही आयकर विभागाने धाडी टाकल्याचं समोर आला आहे.