टिओडी मराठी, तेलंगणा, दि. 11 ऑगस्ट 2021 – तेलंगणा राज्याच्या मेडक जिल्ह्यामध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका स्थनिक भाजप नेत्याला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे खळबळ माजली आहे. हे कृत्य कोणी आणि का केले? याचा तपास पोलीस करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काही अज्ञात व्यक्तींनी स्थानिक भाजप नेत्याला कारच्या डिक्कीमध्ये बंद केलं आणि त्यानंतर कार पेटविली. ज्यात भाजपच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला.
व्ही. श्रीनिवास प्रसाद असे या नेत्याचं नाव आहे. प्रसाद हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते.
याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मेडकच्या एसपी चंदना दीप्ती यांनी दिलेली माहिती अशी, काही अज्ञात लोकांनी भाजप नेत्याला त्यांच्या कारमध्ये बंद करून पेटविले आहे.
आम्हाला नेत्याचा जळालेला मृतदेह त्याच्या कारच्या डिक्कीत सापडला आहे. प्रसाद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
Telangana | A local BJP leader in Medak District died after he was set ablaze by unidentified persons. A case has been registered.
"Few persons set him on fire along with his car. We found his burnt body in the trunk of his car," said Chandana Deepti, SP, Medak (10.08) pic.twitter.com/wdmEyThavf
— ANI (@ANI) August 10, 2021