शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपलेली आहे. (National Executive of Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना भवनातून मातोश्री निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांची नेते पदावरून हकालपट्टी करण्यात येईल अशा चर्चा होत्या, मात्र असा कुठलाही निर्णय शिवसेना कार्यकारिणीत घेण्यात आलेला नाही. तूर्तास शिवसेनेची भूमिका ही ‘वेट अँड वॉच’ अशी आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव (Important resolutions in national executive of Shivsena) घेण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील महत्त्वाचे ठराव
१) शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि कायम राहील.
२) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कार्यकारिणीचा विश्वास, पक्षात निर्णय घेण्याचे त्यांना सर्वाधिकार.
३) शिवसेनेशी गद्दारी करणार्यांवर कठोर कारवाईचे पक्षप्रमुखांना अधिकार.
४) बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कुणालाही वापरता येणार नाही.
५) शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाचे बांधिलकी कायम राहील.