शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर शिंदे गटाची पत्रकार परिषद, वाचा प्रमुख मुद्दे

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde group press conference) यांच्या गटाच्या वतीने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला ऑनलाईन माध्यमाद्वारे आमदार दीपक केसरकर यांनी संबोधित केले. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आणि कोणाच्याही दबावाखाली आम्ही निर्णय घेतलेला नाही, असे काही मुद्दे यावेळी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मांडले आणि आपल्याला ही पत्रकार परिषद घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यापुढे एकनाथ शिंदे गटाची भूमिका आपण मांडणार, असे देखील त्यांनी सांगितले.

दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले प्रमुख मुद्दे;

आम्ही अजूनही शिवसैनिकच आहोत.

आम्ही कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही.

कोणाच्याही दबावाखाली आम्ही निर्णय घेतलेला नाही.

बाळासाहेबांचे विचार मांडणारे आम्ही सगळे एकत्र आलो.

नोटीस पाठवून आम्हाला घाबरवलं जात आहे.

आम्ही सेनेतून बाहेर पडलो असं भासवलं जात आहे.

55 आमदारांचा नेता 16 जण कसे बदलणार?

आमच्याकडे 2 तृतीयांश बहुमत आहे.

एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत, आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत.

काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना हायजॅक केली होती.

आम्ही विधिमंडळात बहुमत सिद्ध करून दाखवू.

विधिमंडळात शिवसेना आम्हीच आहोत.

सेनेचा पाठिंबा काढण्याचा प्रश्नच नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीला कोणत्याही परिस्थितीत आमचा पाठिंबा नाही.

आम्ही नोटीसांना कायदेशीर उत्तर देऊ.

शनिवार रविवार गृहीत धरून नोटिसा पाठवण्यात आल्या.

शिवसैनिकांनी मोडतोड बंद करावी, कायद्याचं पालन करावं.

राजकीय परिस्थिती नीट झाल्यानंतर मुंबईत येऊ.

संजय राऊत फक्त फायर बोलतात, त्यामुळे फक्त आग लागते.

आपण भाजपा सोबतच जाण्यात आपले हित, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

 

Please follow and like us: