TOD Marathi

आतापर्यंत मवाळ असलेल्या शिवसेनेने (shiv sena) आता मात्र बंडखोराबद्दल कडक कारवाईच्या भूमिकेत असल्याचे पहायला मिळत आहे. शनिवारी दिवसभर सुरु असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पहिल्यांदाच ( CM Uddhav Thackeray ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोष व्यक्त केला.

 

जनतेची मतं मागायची असतील तर स्व:ताच्या बापाचे नाव वापरा असे म्हणत बंडखोर आमदार आणि मंत्र्यांबाबत शनिवारी संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे शिवसेना आणि पक्ष प्रमुख हे आता अॅक्शन मोडमध्ये असल्याचे चित्र दिसतंय. (Rebellious) बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक हे आता रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे कार्यकरणीच्या बैठकीत संघटनात्मक निर्णय देखील घेतले जात आहेत. त्यामुळे पक्षात पडलेली फूट भरुन काढण्यासाठी स्वतः कोरोनाबाधित असतानाही मुख्यमंत्री आता रिंगणात उतरले आहेत.

 

बंडखोरांमध्ये केवळ आमदारच नाहीतर मंत्र्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे याबाबत शिवसेना पक्ष काय निर्णय घेणार याकडे आमदारांचे आणि सर्वसामान्य जनतेचेही लक्ष लागले होते. आता मात्र कार्यकरणीच्या बैठकीत पक्षात कुणाला ठेवायाचे आणि कुणाला नाही याबाबत सर्व अधिकार हे एकमताने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. असे असले तरी या कार्यकरणीत आमदार आणि मंत्र्यांच्या कारवाईबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, संध्याकाळी याबाबत संकेत दिले जातील असे खा. संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे आज बंडखोर आमदार आणि मंत्र्यांच्या कारवाईबाबत मोठा निर्णय शिवसेनेकडून घेतला जाऊ शकतो.

आता पक्ष प्रमुखच कडक भूमिकेत

बंडखोर आमदारांच्या बाबतीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली नव्हती. मात्र, शनिवारी पदाधिकारी आणि कार्यकरणीच्या बैठकीत त्यांनी या आमदारांचाही समाचार घेतला. एकतर बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना हे नाव वगळून निवडणुकीला सामोरे जाऊनच दाखवा असे त्यांनी आव्हान दिले तर त्यानंतर लागलीच आमदारांच्या कारवाईबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पक्षातून कुणाकुणाची हकालपट्टी होणार हे लवकरच समजणार आहे.